आश्रमशाळेत २ मतिमंद विद्यार्थ्यांचा विषबाधेने मृत्यू

0

इगतपुरी, लोकशाही न्यूज नेटवर्क 

इगतपुरी येथील मतिमंद विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेतून एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. उलट्या होऊन दोन मतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 2 विद्यार्थी गंभीर असून त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कालपासून विद्यार्थ्यांना हा त्रास होत असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे इगतपुरीसह जिल्हाभरात खळबळ माजली आहे.

विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. हर्षल गणेश भोईर (वय 23 रा. भिवंडी), मोहम्मद जुबेर शेख (वय १० रा. नाशिक) या दोन विद्यार्थ्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी सुरु झाली असून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख पथकासह दाखल झाले आहेत.

खाल्लेल्या अन्नाचे नमुने जमा करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे मृतदेह पुढील तपासणीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. देवेंद्र बुरंगे (वय १५), प्रथमेश बुवा (वय १७) या गंभीर विद्यार्थ्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालय, इंदिरा भारती कर्णबधीर निवासी विद्यालय, रखमाबाई अपंग युवक स्वयंसहायता केंद्र असे मतिमंद विद्यालय चालवणाऱ्या संस्थांची नावे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.