‘जळगाव शहरातून भविष्यातील इसरो वैज्ञानिक निर्माण होणार’

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

आझाद क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ, बळीरामपेठ मंडळाचे यंदा २५ वे वर्ष साजरे आहे. मंडळाच्या वतीने अनेक वर्षांपासून श्री गणेशोत्सवात शैक्षणिक आणि सामाजिक विषयांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहे. मागील वर्षी भारतीय सैनिकांची शौर्य गाथा सांगणारे ‘सियाचीन ग्लेशियर’ ही आरास साकारली होती. सामाजिक एकता जोपासण्यासाठी सिंधी बांधवांचे सिंधी सेवा मंडळ, मुस्लीम बांधवांचे हाजी-आली दर्गा, शीख बांधवांचे सुवर्ण मंदिर, ऐतिहासिक देखाव्यांसह विशेषतः समाजातील सर्व घटकांना सामवून घेणारे आरास करण्यावर मंडळाचा भर आहे.

कोरोना काळातील मंडळाची सेवा

कोरोना काळात मंडळाने अतिरिक्त खर्च टाळून परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेकरिता व्यवस्था केली. परिसरात धूर फवारणी, सॅनिटायझर फवारणी, रुग्णांची वैद्यकीय सहायता, रक्तदान शिबिरे, ग्रामीण तसेच आदिवासी भागात रुग्ण साहित्याचे वाटप, अर्सेनिक अल्बम या रोगप्रतिकारक औषधींचे वाटप आदि कार्य केले आहे. मंडळातील प्रत्येक सभासदाने सामाजिक दायीत्वाचे भान ठेवत आपल्या परीने समाजसेवा केलेली आहे. यात रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मंडळाचे सभासद राहुल घोरपडे आणि मयूर पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात रुग्णसेवा केली. कोरोनातील मृतदेह परिवार जन स्वीकारत नसतांना कपिल राणा आणि रोहित कुमावत यांनी रुग्णांचे अंतिम संस्कार देखील केले. योगाचार्य कृणाल महाजन यांनी विविध रुग्णालयात जाऊन रुग्णांना प्राणायामाचे धडे देऊन समुपदेश केले तर अश्विन भोळे यांच्या माध्यमातून ‘मोठ्या प्रमाणत आरोग्य शिबिरांचे नियोजन’ प्रतिक पाटील यांच्या वतीने मास्क आणि सॅनिटायझर वाटप तसेच आदित्य बागरे आणि रमेश काका जगताप यांच्या वतीने गरजू नागरिकांना अन्नाचे पाकीट वाटप आदी कार्य मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

विज्ञान नगरी   

यंदा मंडळाच्या वतीने इसरो अर्थात Indian Space Research Organisation वर आधारित ‘विज्ञान नगरी’ ही थीम घेऊन आरास साकारण्यात येत आहे. यात इसरोचा गौरवशाली इतिहास आणि चांद्रयान, मंगलयान सारख्या यशस्वी मोहिमांची माहिती देण्यात येणार आहे. सोबत विश्व रेकोर्ड केलेले PSLV आणि GSLV रॉकेट लॉन्चर्स यांची प्रतिकृती आणि संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न मंडळाचा आहे. सोबत आपली सूर्यमाला आणि इतर ग्रहांची माहिती विद्यार्थ्यांना देण्याचे नियोजन आहे. तसेच शहरातील विद्यार्थ्यांना या सर्वांची माहिती मिळून आपल्या शहरातून देखील भविष्यातील वैज्ञानिक निर्माण व्हावे हा हेतू मंडळाचा आहे.

यात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने मंडळ इसरो वर आधारित ‘वैज्ञानिक प्रोजेक्ट’ विद्यार्थ्यांनी तयार करून आणावे यासाठी निमंत्रित करीत आहोत. विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टची प्रदर्शनी संपूर्ण दहा दिवस भरविण्यात येणार आहे. ज्यात विद्यार्थ्यांना जवळपास ३० हजारांचे बक्षीस, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्याची योजना आहे.

अहमदाबाद येथील इसरो सेंटरला मंडळाची भेट

गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे इसरोचे ‘विक्रम साराभाई स्पेस प्रदर्शनी’ येथे मंडळाचे सभासद अश्विन भोळे, राहुल घोरपडे, मयूर पाटील आणि कृणाल महाजन यांनी भेट दिली. यादरम्यान इसरो वैज्ञानिक आणि अधिकाऱ्यांशी इसरोचे झालेले यशस्वी अभियान आणि भविष्यातील होऊ घातलेले अभियान यावर चर्चा झाली. यातून जळगावकरांना प्रेरणा कशी देता येईल यावर चर्चा होऊन त्याप्रमाणे जळगाव येथे आरास साकारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

शासकीय आद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहकार्य

इसरोवर आधारित वैज्ञानिक उपक्रम तयार करून घेण्यासाठी जळगाव मधील ITI अर्थात आद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ए.आर.चौधरी, प्राध्यापक श्री. दीपक कोळी, कार्यालयीन अधीक्षक श्री. बाळासाहेब कुमावत आणि विद्यार्थ्यांचे मोठे सहकार्य लाभत आहे. मागील महिन्यापासून विद्यार्थी सर्व प्रतिकृती तयार करत आहे. यात विद्यार्थ्यांना देखील एक प्रोजेक्ट म्हणून देता येईल का ही दूर दृष्टी आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांनतर इसरोच्या सर्व प्रतिकृती आद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात स्थापन करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.