१२वी च्या निकालात तब्बल ‘इतके’ टक्क्यांनी झाली घट…

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांपैकी ९१. टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहेत. राज्यात कोकण विभागातील ९६. ०१ टक्के सर्वाधिक विध्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुंबई विभागाचा ८८.१३ टक्के अशी सर्वात कमी टक्केवारी आहे. यंदा राज्यात १४.५७ लाख विद्यार्थ्यांनी HSC बोर्डाची परीक्षा दिली आहे. दुपारी २ वाजता शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होत आहे.

राज्य मंडळाच्या या परीक्षेसाठी. १४लाख २८ हजार १९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल २.९७ टक्क्यांनी घट झाली आहे. निकालापूर्वी राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सर्व विद्यार्थ्यांना निकालासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.