पाचोरा शहर युवा सेना तर्फे कुस्तीगीर बांधवांचे कुस्तीगीर दिनानिमित्त सत्कार

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

२३ मे रोजी जागतिक कुस्तीगीर दिनानिमित्त राम मंदिर येथे महावीर व्यायाम शाळा येथील सर्व कुस्तीगीर बांधवांचे पाचोरा-भडगाव मतदार संघाच्या उबाठा शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नैतृत्वाखाली व युवासेना पाचोरा तर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रभू राम मंदिराचे अध्यक्ष मयूर शेलार, पाचोरा तालुका कुस्तीगीर मंडळाचे अध्यक्ष कैलास आमले, संभाजी ब्रिगेडचे राजू पाटील, दिनेश पाटील, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख संदीप जैन, तालुकाप्रमुख भूपेश सोमवंशी, शहर संघटक प्रशांत सोनार, अॅड. गौरव पाटील, युवा सैनिक शुभम पाटील यांचेसह युवासेनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवासेना उपजिल्हाप्रमुख संदीप जैन यांनी सर्व बालगोपाल कुस्तीगीरांचा सत्कार करून त्यांच्या लहान वयात ज्या पद्धतीने ते तालीम करीत आहेत खरोखरच भविष्यात आपल्या देशाचे नाव अभिमाने उंचावेल. याप्रसंगी सर्व बालगोपाल कुस्तीगरांचे कौतुक करून त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या व ज्येष्ठ कुस्तीगरांचे मनापासून आभार मानले की, तुमच्यासारख्या जेष्ठ कुस्तीगीरांच्या माध्यमातून हे बालगोपाल आज इथं ज्या पद्धतीने तालीम करीत आहे म्हणून माझ्या सर्व युवा बांधवांना मी विनंती करतो की, मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहून जर प्रत्येकाने एक तास कसरतीसाठी व तालीमसाठी दिला तर ते आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरेल याचा सर्वांनी विचार करावा अशा पद्धतीने हा छोटेखानी कार्यक्रम राम मंदिरात संपन्न झाला. तसेच उपस्थितांनी कुस्तीगिरांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.