यंदाची होळी, धुळवड होणार धुमधडाक्यात ! राज्य सरकारकडून निर्बंध मागे, नवे परिपत्रक जारी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. देशभरात 17 आणि 18 तारखेला होळी, धुलिवंदनचा सण साजरा केला जाणार आहे. होळी, धुळवडवर राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नाहीत. मात्र, या सणाच्या निमित्ताने गृहखात्याने मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत तसेच नवी नियमावली जाहीर केली आहे.

गृहखात्याने जारी केलेली नवी नियमावली

– कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतो गर्दी न करता कोविड अनुरूप वर्तणुक नियमांचे पालन करून साजरा करण्यात यावा.

– एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येते. परंतु यंदाची होळी साधेपणाने साजरी करावी.

– होळी, शिमगा निमित्त विशेष करून कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. तसेच गर्दी न होण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी.

– कोवीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण तसेच संबंधित महानागरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे पालन करावे

– मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचे आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.