जळगाव क्रिटिकल सोसायटी आणि आयएमए जळगावतर्फे महिलांचे आरोग्यविषयक परिषद संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव क्रिटिकल सोसायटी आणि आयएमए जळगाव यांच्यातर्फे महिलांच्या आरोग्यविषयक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये गर्भवती माता आणि त्यांच्यामध्ये असलेले गुंतागुंतीचे आजार, तसेच प्रसूतीच्या वेळेस होणारा अति रक्तस्त्राव झाल्याने मातेस वाचविणे कठीण होते. परिणामी बऱ्याचदा त्यांना वाचवण्यासाठी त्यांचे गर्भाशय काढावे लागते. या विषयांवर चर्चा करण्यात आली.

तसेच गर्भवती महिलांमध्ये एचआयव्हीचे प्रमाण वाढले आहे. उच्च रक्तदाब आणि त्यातून होणारे गुंतागुंत कसे हाताळायचे, गर्भवती स्त्रियांना होणारे संसर्ग, महिलांच्या अति लठ्ठपणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, हार्ट अटॅक, कॉर्डियाक अरेस्ट यावर देखील चर्चा झाली.

परिषदेवेळी औरंगाबाद एमजीएम हॉस्पिटल मधील कन्सल्टन्ट डॉ. साधना कुलकर्णी, डॉ. आनंद निकाळजे, नोबल हॉस्पिटल पुणे येथील कन्सल्टंट डॉ. बाळासाहेब बांडे, डॉ. अमित द्रविड, पंढरपूर येथील स्त्रीरोग तज्ञ आणि लॉ केलेले डॉ. सुजित दोषी यांनी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले.

यावेळी सूत्र संचालन डॉ. प्रीती भारुडे आणि आयसीयू तज्ञ डॉ. लीना पाटील यांनी केले.

यावेळी क्रिटिकल केअर सोसायटी जळगाव संघटनेची नवीन कार्यकारणी जाहीर झाली. अध्यक्ष डॉ. राजेश डाबी, सेक्रेटरी डॉ. रविंद्र पाटील, खजिनदार डॉ. अमित हिवरकर, कार्यकारी पद डॉ. सुनील सूर्यवंशी, डॉ. पंकज बढे, डॉ. राजेश मंवतकर भुसावळ,डॉ. डी. ओ. पाटील चोपडा, डॉ. पल्लवी राणे, डॉ. कल्पेश गांधी
यांनी पदभार स्वीकारला.

यावेळी डॉ. संजय उंबरकर, डॉ. अभिनय हरणखेडकर, डॉ. राहुल महाजन, माजी नगराध्यक्ष डॉ. के. डी. पाटील, उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आयएमए अध्यक्ष डॉ. सी. जी. चौधरी, आयएमए सेक्रेटरी डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. सुमन लोढा, डॉ. विलास भोळे आदींची उपस्थिती होती. या परिषदेमध्ये जळगाव जिल्ह्यातील १५० पेक्षा जास्त भूलतज्ञ, स्त्रीरोग तज्ञ आणि फिजिशियन यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.