अक्षय कुमार दिसणार “हेरा फेरी ३” मध्ये ?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

‘हेराफेरी’, आणि ‘फिर हेरा फेरी’ यामध्ये आपल्याला अक्षय कुमार (Akshay Kumar), सुनील शेट्टी (Sunil Shetty), परेश रावल (Paresh Rawal) आणि अनेक स्टार कास्ट बघायला मिळाले होते, सोबतसीच प्रेक्षकांना ह्या दोघं चित्रपटांना आपली पसंती दर्शवली होती. आणि आता बऱ्याच दिवसांपासून हेरा फेरी ३ (Hera Pheri 3 ) या चित्रपटाबद्दल चर्चा रंगत होत्या पण आता या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. एवढेच नव्हे तर राजू, बाबूभैय्या आणि श्याम या त्रिकुटाने अनेक पिढ्यांची निखळ करमणूक केली. आता हि तीन अतरंगी माणसं पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. हेरा फेरी ३ च्या शूटिंगला कधी सुरुवात होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर हेरा फेरी ३ च्या शूटिंगला आजपासून धमाकेदार सुरुवात झाली आहे.

हेरा फेरी ३ साठी अक्षय कुमार, सुनिल शेट्टी आणि परेश रावल एकत्र आले आहेत. याआधी अक्षय हेरा फेरी ३ मध्ये काम करणार नाही असं सांगण्यात आलं होतं. पण आता हेरा फेरी ३ साठी तयार झाला असून त्याने परेश रावल – सुनील शेट्टी सोबत हात मिळवले आहेत. हेरा फेरी ३ साठी अक्षय-सुनील आणि परेश रावल आज शूटिंग साठी एकत्र जमल्याचे वृत्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.