अशोक चव्हाणांच्या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ….

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

राजकारण आणि राजकारणी म्हंटले म्हणजे कधी काय होईल सांगता येत नाही. शिंदे आणि ठाकरे गटाचे वाद आपल्यासाठी नवीन नाही. पण आता एकीकडे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण नवीन धक्कादायक खुलासा या ठिकाणी केला आहे. आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, तसंच घातपाताचा प्रयत्नही केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान या प्रकरणावर अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले. माझ्यावर पाळत ठेवून माझा घातपाल करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. माझ्या नावाने उद्धव ठाकरे यांना लिहलेले पत्र व्हायरल होत आहे. तसेच माझ्याबद्दल गैरसमज पसरवून राजकीय फायदा उचलला जात आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले. अशोक चव्हाण म्हणाले, माझ्या राजकीय विरोधकांकडून मला संपवण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच माझ्या बदनामीचा प्रयत्न केला जात आहे. याप्रकरणी नांदेड पोलिसात मी तक्रार दाखल केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.