येत्या दोन, तीन दिवसांत ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मान्सून महाराष्ट्रात उशिरा दाखल झाला खरा, पण आता चांगलाच जोर धरून आहे. मुंबई, पुणे यांसारसंख्या शहरात पावसाने थैमान घातले आहे. परंतु दोन ते तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. राज्यात पावसाची स्थिती कशी असेल याबाबद्दल हवामान खात्याने माहिती दिली असून, येत्या तीन ते चार दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी अतिवृष्टीचाही (Heavy rain) अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसळीकर यांनी वर्तवला आहे.

पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
मान्सूनचा पाऊस राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. त्यानंतर हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून बहुतेक ठिकाणी माध्यम सावरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या काळात उंच भागावर जोरदार ते अतिजोर्दार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.