बॅडमिंटन खेळण्याच्या कारणावरून तरुणाला घरात घुसून मारहाण

0

जळगाव ;- बॅट मिंटन खेळण्याच्या कारणावरून एका तरूणाला दोन जणांनी घरात घुसून बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना शहरातील जुना आसोदा रोड परिसरात बुधवारी घडली. या घटनेबाबत रात्री उशीरा शनीपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला .

जळगाव शहरातील जुना आसोदा रोडवरील वडामळा येथे राहणाऱ्या पुष्पक विजय सोनवणे वय २१ हा बुधवारी ३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजताकाही मुलांसोबत बॅटमिंटन खेळत होता. त्यावेळी याच परिसरात राहणारे लोकेश नरहर इंगळे आणि आकाश नरहर इंगळे या दोघांनी पुष्पकला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी पुष्पक हा शेजारी राहणाऱ्यांच्या घरात घुसला. तेव्हा लोकेश इंगळे आणि आकाश इंगळे यांनी घरात घुसून पुष्पकला बेदम मारहाण करून डोक्याला दुखापत केली. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर पुष्पक सोनवणे याने शनीपेठ पोलीस ठाण्यात  तक्रार दिलीनुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.