फर्निचरच्या दुकानाला लागलेल्या आगीत पाच लाखांचा मुद्देमाल जाळून खाक

0

जळगाव ;– फर्निचरच्या दुकानाला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची घटना नशिराबाद येथे :मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या आगीत दुकानातील सुमारे पाच लाख रुपयांच्या फर्निचरचा माल जळून खाक झाला. नगर परिषदेचा अग्निशमन बंब ने ही आग आटोक्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे.

नशिराबाद येथे सुतार व्यावसायिक करणारे शेख सलीम शेख सुपडू यांच्या दुकानाला मंगळवार दि. २ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.यात दरवाजे,कटर मशीन आणि इतर साहित्य असे सुमारे ५ लाखाचे साहित्य जळून भस्मसात झाले आहे. याबाबत नशिराबाद पोलिसांत अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून तपास पोहेकॉ अतुल महाजन करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.