ईडीचा समन्स बेकायदेशीर, त्यांना मला तुरुंगात बघायचे आहे; अरविंद केजरीवाल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीनं तब्बल तीन समन्स बजावले, तरी सुद्धा अरविंद केजरीवाल चौकशीसाठी हजर झाले नाहीत. अशातच काही आप नेत्यांनी बुधवारपासूनच ईडीनं अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याचा घाट घातल्याचे दावे करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीतील केजरीवालाच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशातच ईडीनं पाठवलेल्या समन्सविरोधात आज दिल्लीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टीकरण दिल आहे. २ वर्षांत भाजपच्या अनेक संस्थांनी छापे टाकले, मग एकही पैसा का मिळाला नाही? असा सवालही यावेळी अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे. आप नेत्यांना जेलमध्ये टाकून आता मला अटक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. ईडीनं कायदेशीर समन्स पाठवावं. कायदेशीर समन्सचंच पालन करेन, असंही केजरीवाल म्हणाले.

ईडीने पाठवलेलं समन्स बेकायदेशीर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, “गुंडगिरी उघडपणे सुरु आहे. कोणालाही पकडा आणि तुरुंगात टाका, माझी सर्वात मोठी ताकद प्रामाणिकपणा आहे. खोटे गुन्हे दाखल करून त्यांना माझ्या प्रामाणिकपणाला तडा पोहोचवायचा आहे. माझ्या वकिलांनी सांगितले की, ईडीनं पाठवलेली सर्व समन्स बेकायदेशीर आहेत. हे बेकायदेशीर का आहेत, याची उत्तरं मी ईडीला दिली आहेत. त्यांनी योग्य समन्स पाठवलं तर मी तपासात सहकार्य करेल भाजपचा उद्देश्य योग्य तपास कारण नसून, मला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रोखणं आहे. मला लोकसभा निवडणुकीचा प्रचार करता येऊ नये म्हणून मला अटक करण्याचा त्यांचा कात आहे.”

भ्रष्टचाराचा एक पैसाही मिळालेला नाही
अरविंद केजरीवाल म्हणाले की, “तुम्ही लोक दोन वर्षांपासून दारू घोटाळ्याचे नाव ऐकत आहात. मात्र आजपर्यंत या घोटाळ्यात एक पैसाही सापडलेला नाही. कारण कोणताही घोटाळा झाला नाही. असते तर पैसे मिळाले असते. खोटे आरोप करून भाजप मला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रोखू इच्छित आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.