बापरे! हमासने 14 दिवसांत इस्रायलवर डागले 6900 हून अधिक रॉकेट… इतक्या निष्पापांचा गेला बळी…

0

 

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

इस्रायल-हमास युद्धाला 14 दिवस पूर्ण झाले आहेत. यादरम्यान इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने हमासच्या दहशतवाद्यांबाबत एक विशेष डेटा जारी केला आहे. इस्रायली लष्कराने दावा केला आहे की, गेल्या 14 दिवसांत हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर 6900 हून अधिक रॉकेट डागले आहेत. यापैकी 450 हून अधिक रॉकेट गाझामध्येच निकामी होऊन पडले आहेत. हमासच्या या हल्ल्यात इस्रायलमध्ये आतापर्यंत १४०० हून अधिक लोक आणि सैनिक मारले गेले आहेत. तर 4600 जखमी झाले आहेत. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने हमासच्या 1000 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला आहे. यामध्ये हमासच्या जवळपास 12 टॉप कमांडरचाही समावेश आहे.

इस्रायलने म्हटले आहे की, आत्तापर्यंत हमासने गाझा येथून 6,900 हून अधिक रॉकेटने हल्ला केला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी 200 हून अधिक लोकांना ओलीसही ठेवले आहे. यामध्ये अनेक देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. हमासने गेल्या ७ ऑक्टोबरला इस्रायलवर पहिला हल्ला केला होता. त्यानंतर हमासच्या दहशतवाद्यांनी पहिल्याच दिवशी इस्रायलवर एकाच वेळी 5000 हून अधिक रॉकेट डागले होते. यानंतर मोठ्या प्रमाणात दहशतवादी गाझा सीमा ओलांडून इस्रायलच्या सीमेत घुसले. इस्रायलमध्ये घुसल्यानंतर हमासचे दहशतवादी रस्त्यावर आणि शहरांमध्ये कहर करत होते. हमासच्या दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात इस्रायली लोक आणि सैनिक मारले होते.

 

इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल गाझा उद्ध्वस्त झाला

हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझावर जोरदार पलटवार सुरू केला. इस्रायलने मोठ्या प्रमाणात बॉम्बफेक करून हमास दहशतवाद्यांचे मुख्य ऑपरेशनल लष्करी मुख्यालय आणि लॉन्चिंग पॅडसह सर्व तळ उद्ध्वस्त केले. या काळात इस्रायलने आत्तापर्यंत 1000 हून अधिक हमास दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला आहे. यामध्ये हमासचे १२ टॉप कमांडरही मारले गेले आहेत. याशिवाय इस्रायलच्या हद्दीत घुसलेले हमासचे दहशतवादीही मारले गेले आहेत. मात्र, इस्रायलने गाझामध्ये मारल्या गेलेल्या नागरिकांच्या संख्येबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही. तर हमासच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की गाझामध्ये आतापर्यंत सुमारे 3000 नागरिक मारले गेले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.