विद्यापीठात राष्ट्रीय सायबर सुरक्षा जनजागृती महिना उत्साहात साजरा झाला

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव कवायत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाराष्ट्र सायबर सेल आणि क्विक हिल फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 20th ऑक्टोबर रोजी सायबर सुरक्षा जनजागृती महीण्याच्या अनुषंगाने नाटीका, पोस्टर विविध प्रकार जनजागृती करण्यात आली.

विद्यापीठातील संगण‌कशास्त्र प्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून समन्वयक राजु आमले यांचा मार्गदर्शनाखाली नाटीका, पोस्टर प्रेजेंटेशन, Quiz competition इ. स्पर्धांचे आयोजन करून यशस्वीरीत्या पार पाडले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परीसरात फिरून संपूर्ण शिक्षक, कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांना सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करून माहीती पुस्तीका download करून दिली.

कार्यक्रमात स्वयंसेवक गायत्री ठाकरे, श्रेया भोंबे, कुणीका बैरनार, दर्शना हिरे, तेजल कोल्हे अंशीका गुप्ता व राजश्री कापुरे यांनी फोटो मॉर्फिंग या fraud वर नाटिका सादर केली. तसेच, नीकीता लोहार, संजना भेधुरकर, लीना भोंडे, नेहा पवार, वेष्णवी साळुंके, शितल पवार, प्रियंका राठोड यांनी सायबर क्राईम & साय‌बर सेफ्टी या विषयावर नाटीका सादर केली. तसेच, पायस सावळे, पौर्णीमा चौधरी, सायली चौधरी. प्रगती कोल्हे रेवती फिरके, व अश्विनी बोरोले यांनी Matrimonial fraud वर नाटीका सादर केली यानंतर महाराष्ट्र सायबर सेल निर्मित ” सावध व्हा पैसा जपा. सांगतोय आपला पोलीस बप्पा ” या गाण्यावर सर्वं स्वयंसेवकांनी पोस्टर प्रेझेंटेशन केले. कार्यक्रमात जळगाव सायबर सेल चे पोलीस उपनिरीक्षक मा.दिगंबर थोरात यांनी विद्याथ्यार्थ्यांना ऑनलाईन होणाऱ्या विविध प्रकारच्या frauds बद्दल माहीती दिली.

तसेच विद्यार्थीनींना cyber bulleying, Sexting , Photo Morphing याबद्दल त्यांनी महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले त्यात त्यांनी सांगीतले की या सगळ्या गोष्टींपासून कसे सावध राहीले पाहिजे जर असे आपल्यासोबत झाले तर काय करावे इ. अश्या महत्वपुर्ण गोष्टी त्यांनी सांगीतल्या. त्यानंतर आशिष पाटील यांनी उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षीततेची शपथ दिली, या कार्यक्रमास संगणक शास्त्र प्रशाळेचे संचालक श्री. एस. आर. कोल्हे , समन्वयक राजु आमले, प्रा. सुरेंद्र कापसे, प्रा. संदीप भामरे, प्रा. अजय सुरवाडे व जळगाव सायबर सेल चे पो. उपनिरीक्षक दिगंबर थोरात व पो. नाईक सचिन सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गौरव चौधरी व गायत्री ठाकरे यांनी केले व आशिष पाटील यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.