तुकारामवाडीत हल्ला करणाऱ्या ६ जणांच्या मुसक्या आवळल्या

0

जळगाव;- जुन्या वादातून २०२२ मध्ये सुरेश ओतारी व अरुण गोसावी यांच्यावर शासकीय रुग्णालयाजवळ खुनी हल्ला झाला होता. त्यात सुरेश ओतारी याचा मृत्यू झाला होता. तर अरुण गोसावी जखमी होता. आता दि. ६ एप्रिल २०२४ रोजी अरुण गोसावी याच्या घरावर रात्री पुन्हा त्याच हल्लेखोरांनी खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांच्या घराची तोडफोड करण्यात आली . याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील सहा संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी ९ एप्रिल रोजी रात्री १० वाजता वाघ नगर परिसरातून अटक केली आहे.

६ एप्रिल २०२४ रोजी रात्री ११:४५ वाजेच्या सुमारास अरुण गोसावी हे घरी असताना भुषण उर्फ भासा विजय माळी, आकाश उर्फ सुकलाल खंडया ठाकुर, पवन उर्फ बद्या दिलीप बावीस्कर, सचिन उर्फ टिचकुल्या कैलास चौधरी, सर्व रा. तुकारामवाडी जळागावं आकाश उर्फ ब्रो रविंद्र मराठे, चेतन उर्फ बटाटया रमेश सुशिर सर्व रा. प्रिपाळा जळगाव अशांनी अरुण भिमराव गोसावी रा. हनुमान मंदीराजवळ, तुकारामवाडी जळगाव यांच्या घरावर त्यांनी सन 2022 मध्ये (मयत) सुरेश विजय ओतारी याच्या केलेल्या खुनाची फिर्याद दाखल केलेल्या कारणा वरुन घरात घुसुन घरातील दरवाजे व खिडक्या तोडुन घर सामानाची तोडफोड करून नुकसान केले होते. तसेच शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. म्हणुन सदर बाबतीत अरुण गोसावी यांनी फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधिक्षक महेश्वर रेडडी यांच्या सुचना होत्या त्या प्रमाणे त्याचा शोध सुरु असतांना ते वाघनगर जळगाव परिसरात असल्याबाबत माहिती पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती त्याप्रमाणे सर्व 6 आरोपी यांना काल रात्री वाघनगर परिसरातुन ताब्यात घेतले होते व त्यांना अटक करुनन्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली .कारवाई ही पोलीस अधिक्षक महेश्वर रेडडी अपर पोलीस अधिक्षक अशोक नखातेउपविभागीय पोलीस अधिकारी शसंदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक बबनआव्हाड सपोनि/महेद्र वाघमारे, पोउनि/दत्तात्रय पोटे, पोउनि/दिपक जगदाळे ,सफौ/ अतुल वंजारी, किशोर पाटील, चंद्रकात पाटील, सचिन पाटील, ललीत नारखेडे, छगन तायडे, किरण पाटील, नितीन ठाकुर गणेश ठाकरे, संजीव मोरे, साईनाथ मुंढे यांनी केली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.