जळगावात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला ; एकावर गुन्हा

0

जळगाव : -दारुच्या नशेत असलेल्या गजानन विलास बाविस्कर याने सागर जनार्दन गव्हाणे (वय २९) यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील शिवाजीनगरातील हुडको परिसरात २ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर हुडको परिसरात सागर जनार्दन गव्हाणे (वय २९) हे पानटपरी चालवत असून . दि. २ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास दारुच्या नशेत असलेला गजानन विलास बाविस्कर हा त्याठिकाणी आला. त्याने सागरसोबत वाद घालीत त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने सागरच्या पाठीवर आणि हातावर वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी सागर याने दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.