जळगावात तरुणावर चॉपरने वार

0

जळगाव : –कुठलेही कारण नसताना स्वामी राजेंद्र पोतदार (वय ३१) यांना दीपक दगडू भोई व युवराज दगडू भोई या दोघा भावांनी बेदम मारहाण केली. यामध्ये दीपक याने चॉपरने तर युवराज याने काचेच्या बाटलीने स्वामीच्या डोक्यावर वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. १ एप्रिल रोजी शिवशंकर कॉलनीत घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहतील इंद्रप्रस्थ नगरातील शिवशंकर कॉलनीत स्वामी राजेंद्र पोतदार हा तरुण राहायला असून तो सुवर्ण कारागीर असून त्यावर आपली गुजराण करतो. दि. १ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्याच परिसरात राहणारे दीपक भोई व युवराज भोई यांनी काहीही एक कारण नसतांना स्वामी पोतदार याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दीपक याने त्याच्याजवळील चॉपरने तर युवराज याने काचेची बाटली स्वामी व त्याच्या भावाच्या डोक्यावर मारुन त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्या आईला देखील मारहाण केली. त्यांनी लागलीच शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दीपक दगडू भोई व युवराज दगडू भोई (दोघ रा. शिवशंकर कॉलनी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विरेंद्र शिंदे हे करीत आहे.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.