मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याची ‘एनआयए’ला मेलद्वारे धमकी !

0

मुंबई / लोकशाही न्युज नेटवर्क
मुंबईवर हल्ला करण्याची धमकी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए ला एका मेलद्वारे पाठविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणे, विमानतळ, रेल्वे स्थानक यांच्यासह अनेक ठिकाणी तपासासोबत सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.

एनआयए कडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षालाही गुरूवारी रात्री १२ च्या सुमारास हा मेल पाठवण्यात आला आहे. मेल करणाऱ्याने आपण तालिबानी असून तालिबाणी संघटनेचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानी याच्या आदेशावर चालत असल्याचा उल्लेख मेलमध्ये केला आहे.

मेलनंतर संपूर्ण तपास यंत्रणा कामाला लागली आहे. हा मेल कुठून व कुणी केला? याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.