१२वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण सूचना, जाणून घ्या कधी मिळणार हॉल तिकीट

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट सोमवारपासून मिळणार आहे. अशी माहिती मंडळाने दिली आहे. विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत ही प्रवेश पत्रिका मिळणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

फेब्रुवारी मार्च 2024 साठी सर्व विभागीय मंडळांच्या कार्य कक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी बारावीच्या परीक्षेची ऑनलाईन प्रवेश पत्र प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावेत अशी सूचना राज्य मंडळांनी केली आहे. प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतीही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेश पत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांनी प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी. असेही मंडळांनी स्पष्ट केले आहे.

प्रवेश पत्र हरवल्यास पुन्हा द्यावे
प्रवेश पत्रात विषय व माध्यम बदल असतील तर, त्यांच्या दुरुस्त्या महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन ते दुरुस्त करून विद्यार्थ्यांना द्यावे. तसेच विद्यार्थ्यांकडून प्रवेश पत्र हरवल्यास संबंधित महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र द्यावे.

Leave A Reply

Your email address will not be published.