रेल्वेने अयोध्येला जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांसाठी महत्वाची बातमी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी जयत तयारी देखील सुरू आहे. काही विधी आधीच सुरू झालेत आणि जगभरातील कोट्यवधी रामभक्त या प्राणप्रतिष्ठेच्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरात राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे, सोबतच प्रत्येक राम भक्ताला अयोध्येत उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्याची इच्छा आहे पण ते शक्य नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर 22 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आला आहे. यात होम-हवन, सत्यनारायण महापूजा आणि शोभायात्रांचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आठ हजार जणांना आमंत्रण देण्यात आले आहे. अनेक व्हीआयपी लोक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी ही बातमी महत्त्वपूर्ण आहे. आजपासून अयोध्येत येणाऱ्या आणि जाणाऱ्या सगळ्या ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. 22 जानेवारीपर्यंत अयोध्येत येणाऱ्या सगळ्या ट्रेन्स रद्द झाल्या आहेत. 24 तारखेनंतरच ट्रेनचे वेळापत्रक येणार आहे. महाराष्ट्रातून अयोध्येला निघालेल्या भाविकांना लखनऊ, गोंडा, सुलतानपूरला, उतरावे लागणार आहे. त्यामुळे थेट अयोध्या रेल्वे स्टेशनवर उतरता येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.