भरत अमळकर यांना डी.लीट पदवी प्रदान

0

जळगाव : – गेल्या ३ दशकातील शिक्षाण व सामाजिक उद्योजकता क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पुण्याच्या अजिंक्य डी. वाय. पाटील ईनोवेशन विद्यापीठातर्फे भरत अमळकर यांना डॉक्टर ऑफ लेटर्स ऑनरिस कौसा (डी. लिट.) या पदवीने राज्यपाल रमेश बैस यांचे हस्ते दि.१६ जानेवारीस विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात सन्मानीत करण्यात आले.

भरत अमळकर यांच्या शिक्षण व सामाजिक उद्योजकता या दोन क्षेत्रांतील ३ दशकांच्या नाविन्य व वैविध्यपूर्ण योगदानासाठी प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ तसेच सीव्हील इंजीनिअर व बांधकाम व्यावसायीक असलेले भरत अमळकर यांना डॉक्टरेट पदवी देण्यात आली. ते शिक्षण व सामाजिक उद्योजकता क्षेत्रात गेल्या ३०-३२ वर्षापासून कार्यरत आहेत. शासनाच्या ऊच्च स्तरीय विविध समित्यांवर सदस्य म्हणून ते काम करत आहेत. भरत अमळकर यांना राज्याचे महामहीम राज्यपाल रमेश बैस, अजिंक्य डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती अजिंक्य डी. वाय. पाटील, कुलगुरू एच. देशपांडे, समन्वयक डॉ. पल्लवी पाटील व १५०० स्नातक उपस्थित होते. जळगावातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला खास ऊपस्थित होते. खान्देशात डी. लिट. पदवी मिळालेले भरतदादा दुसरे यापुर्वी जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्षा पद्मश्री डॉ. स्व. भवरलाल जैन यांना सर्व प्रथम डी. लिट. ही पदवी मिळाली होती. यानंतर डी.लिट. या पदवीने सन्मानीत होणारे भरतदादा हे खान्देशातील बहुधा दुसरे व्यक्ती ठरले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.