राज्यस्तरीय गायन स्पर्धेत मू.जे.महाविद्यालय सर्वोत्कृष्ट

0

जळगाव;- : महिलारत्न पुष्पाताई हिरे कला,विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयातील संगीत विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन गायन स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाच्या संघाने पटकावले. ख्यातनाम शास्त्रीय गायिका मंजुषा पाटील यांच्या शुभहस्ते हे सर्वसाधारण विजेतेपद मूजेच्या संघाला प्रदान करण्यात आले. केसीईचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, संगीत विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी हे विजेतेपद स्वीकारले.

या राज्यस्तरीय स्पर्धेत मू.जे.च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून राज्यपातळीवर आपल्या कलेचा पुन्हा एकदा डंका वाजवला आहे. सदर स्पर्धेत उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धा (मयुरी हरिमकर- तृतीय क्रमांक), उपशास्त्रीय संगीत गायन स्पर्धा (अथर्व मुंडले- तृतीय क्रमांक), भारतीय सुगम संगीत गायन (रितेश भोई-प्रथम क्रमांक), भारतीय समूहगीत गायन स्पर्धा (मू.जे.महाविद्यालय-द्वितीय क्रमांक), पाश्च्यात्त समूहगीत गायन स्पर्धा (मू.जे.महाविद्यालय-प्रथम क्रमांक) यांचा समावेश होता. याप्रसंगी स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख स्वरूपात पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या विजयी संघाचे केसीई सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, केसीईचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, प्राचार्य डॉ. सं.ना.भारंबे यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. संघाला संगीत विभागातील प्रा.कपिल शिंगाणे, प्रा.देवेंद्र गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.