माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

0

 

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

कर्नाटकातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आज सकाळी माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांची प्रकृती खालावली, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधानांना श्वसनाच्या आजारामुळे आज सकाळी डॉ. सत्यनारायण म्हैसूर यांच्या देखरेखीखाली मणिपालमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची सध्याची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.