नांगरणी करण्याच्या कारणावरून एकाला मारहाण ; चौघांविरुद्ध गुन्हा

0

धरणगाव ;– ट्रॅक्टरने नांगरणी करण्याच्या विरोधात करत एका जणाला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील धार शिवारातील शेट गट क्रमांक २७६ मध्ये घडली आहे.. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , दिपक अनंत अट्रावलकर वय ६१ रा. शाहू नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह राहायला असून त्यांचे धरणगाव तालुक्यातील धार शिवारातील शेत गट क्रमांक २७६ मध्ये शेत आहे. १३ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास दिपक अट्रावलकर हे त्यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करत असतांना त्याठिकणी लखिचंद भगवान पाचपोळ, सौरभ लखिचंद पाचपोळ आणि इतर दोन अनोळखी सर्व रा. धार ता.धरणगाव यांनी दिपक अट्रावलकर यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. यात दिपक अट्रावलकर हे जखमी झाले आहे. याप्रकरणी रविवारी १७ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.