अपर पोलीस अधीक्षकांच्या नावाने बनावट खाते ; गुन्हा दाखल

0

जळगाव : अपर पोलीस अधीक्षकांच्या नावाने बनावट खाते सोशल मीडियावर तयार करून पैशांची मागणी करणाऱ्यांविरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियामधील खात्याला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केले आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयातील रायटर अजय शांताराम पाटील (36, रा.नवीन पोलीस कॉलनी, ) यांनी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यातर्फे सायबर पोलिसात 7 जून रोजी फिर्याद दाखल केली आहे. 28 मार्चपासून आजपावेतो कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चंद्रकांत गवळी यांचे फेसबुकवर बनावट खाते उघडून लोकांना फ्रेंड रीक्वेस्ट पाठवून त्याद्वारे पैशांची मागणी केल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.