यावल येथे गुजरातच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग तस्कराला अटक

0

यावल : गुजरात राज्याच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) ड्रग्स तस्कर तरुणाला यावल- भुसावळ रस्त्यावर घोडे पीर बाबाच्या दर्ग्याजवळ रविवारी सायंकाळी सिनेस्टाईल ताब्यात घेतले असून त्याचे इतर तीन साथीदार मात्र पसार होण्यात यशवी झाले.मोबीन शाह असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. त्याचाकडून पोलिसांनी पिस्टल काही साहित्य जप्त केले आहे.

यावल-भुसावळ रस्त्यावरील घोडे पीर बाबा दर्ग्याजवळ कार क्रमांक (जी. जे.05 आर. एम.8480) द्वारे गुजरात राज्यातील सुरत येथील मोबीन शाह हा ड्रग्ज तस्कर आला असता तो मित्रांसोबत दर्ग्याजवळ बसला असताना त्याच्या मागावर गुजरात राज्याचे अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) हे होते. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता हे पथक दाखल झाले व पथकाला पाहून मोबीन शाह हा पसार होत असताना पोलिसांनी त्याच्यावर पिस्टल रोखले व सिनेस्टाइल त्यास ताब्यात घेतले. या कारवाई दरम्यान त्याच्याबरोबर असलेले तीन साथीदार मात्र शेत-शिवारात पसार झाले. मोबीन शहा याच्याकडून पोलिसांच्या पथकाने एक पिस्टलासह काही वस्तू हस्तगत केल्या

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, सहायक फौजदार असलम खान, हवालदार भूषण चव्हाण, मुस्तफा तडवी हे दाखल झाले. गुजरातच्या पथकाने सांगीतले की, संशयित शाह ड्रग्ज तस्कर असून तो पसार असल्याने त्याचा शोध घेत असताना तो यावलमध्ये आढळल्याने त्यास अटक करण्यात आली. संशयिताला गुजरात राज्यातील सुरत येथील दिंडोली पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ही दिंडोली पोलीस ठाण्याचे कुलदीपसिंग हमुभाई दया, दिवेश हरिभाई चौधरी सह इतर अधिकारी व कर्मचारी कर्मचार्‍यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.