गोंडगाव येथे घरफोडी ; सव्वा दोन लाखांचा ऐवज लुटला

0

भडगाव ;- तालुक्यातील गोंडगाव येथे घराच्या मुक्या दरवाजाचा कडीकोयंडा अज्ञात चोरटयांनी तोडून लाकडी फर्निचरच्या कपातून सुमारे सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरटयांनी लांबविल्याची घटना ९ मे रोजी उघडकीस आली . याप्रकरणी भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष माधव मोरांकर वय ७१ हे सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या गोंडगाव येथील घरातून अज्ञात चोरटयांनी कुलूप तोडून कपाटातील २ आलेख ११ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ६ हजारांची रोकड अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला .न याप्रकरणी सुभाष मोरांणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.