सेवासंकल्प येथे गृहउपयोगी किराणा साहित्य,फळ,औषधी,कपडे भेट देऊन वाढदिवस साजरा

0

नावदंर यांच्या वाढदिवसानिमित्त केमिस्ट परिवाराकडून सेवासंकल्प परिवाराला किराणा साहित्य भेट

चिखली – तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील बेसहारा बेघर मनोरुग्णांसाठी सेवासंकल्प परिवाराला महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे मानद सचिव अनिलभाऊ नावदंर यांच्या वाढदिवसानिमित्त गृहपयोगी साहित्य भेट देण्यात आले.

नंदू पालवे व आरती पालवे यांच्या कडून दोनशे दहा मनोरुग्णाची निस्वार्थी सेवा त्यांच्या हातून घडत असून त्यांना त्यांच्या कार्यात थोडं आर्थिक सहाय्य म्हणून केमिस्ट परिवाराकडून अनिल भाऊ नावदंर यांच्या वाढदिवसानिमित्त महत्वाचे किराणा साहित्य त्यात ४९० किलोग्रॅम गहू ,१०० किलो ग्रॅम तांदूळ,६३ लिटर खाद्य तेल,७० किलो तुरडाळ,७२ किलो साखर,३० किलो गूळ,३ बॉक्स बिस्कीटे,१० किलो चना ,१५ किलो पोहे,पाच किलो गहू आटा, हळद पावडर,धनिया, चाय पत्ती,१४० कँघवे,फळ, औषधी,कपडे,स्वेटर,कुर्ती,पायजामा आदी साहित्य भेट म्हणून देण्यात आले याप्रसंगी एम.एस.सी डी.ए.चे मानद सचिव अनिलभाऊ नावदंर,एम.एस.सी.डी.ए चे सदस्य राजेंद्र नहार,राज्य औषधी परिषदेचे सदस्य गणेशजी बंगळे,बुलढाणा जिल्हाध्यक्ष गजाननजी शिंदे,सचिव रामुसेठ आयलानी,उपाध्यक्ष राजेशजी पाटील,रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते तथा केमिस्ट परिवाराचे सदस्य प्रशांत ढोरे पाटील,चिखली शहराध्यक्ष स्वप्नील तायडे,जिल्हा प्रतिनिधी चिखली तालुका सुनील पारस्कर व सर्जेराव भुते,शहर सचिव विनोदजी नागवाणी,ता.उपाध्यक्ष बद्री पानगोळे,जयंतजी शर्मा,अभिजित निंबाळकर, दशरथ हुडेकर,चंद्रशेखर बरोटे आकाशजी सुराणा ,उमेशजी मुंदडा,योगेशजी चांडक,नन्दकिशोरजी काडेकर,नरेशजी नागवाणी,सौ.शिलाताई बोहरा,गणेशजी चांडक,श्रीकांतजी बारकर,सुरेशजी थारकर,देवा गावडे, रवी टाके,जितेन्द जैन,विजय वाधवाणी,दै. लोकशाहीचे विदर्भ प्रतिनिधी गणेशज भेरडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.