भुसावळात गोळीबारच्या घटनेने खळबळ

0

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून भुसावळ शहरात कुठलीही अनुचित घटना, प्रकार घडला नसला तरी गोळीबार झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

भुसावळ शहराजवळ असलेल्या साकरी रस्त्यावर काल रात्री उशीरा गोळीबाराची घटना घडली. यात दोन तरूण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपासाची चक्रे फिरवण्यास प्रारंभ केला आहे. भुसावळात मध्यंतरी अनेक टोळ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारीवर काही प्रमाणात तरी नियंत्रण मिळविण्यात आल्याचे दिसून येत होते. तथापि, काल रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास झालेल्या गोळीबारामुळे पोलिसांना आव्हान मिळाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, गोळीबाराची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे व तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक विलास शेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली असून याबाबतची माहिती जाणून घेतली. या गोळीबाराला जुना वाद आहे का ? या दिशेने तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.