धक्कादायक; वर्षभरात ८४३ अपघात, एकूण ५६४ जणांचा मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय विभागाने (RTO) वर्षभरातील कामाबाबत माहिती दिली. ‘आरटीओ’च्या वायुवेग पथकाद्वारे २०२२-२३ या कालावधीत करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईत कार्यालयाच्या इतिहासात प्रथमच सात कोटींपेक्षा जास्त दंड वसुली झाली. वर्षात एकूण सात कोटी ३५ लाख ४० हजार रुपयांची दंडवसुली झाली. एक कोटी ३८ लाख रुपये करवसुली झाली. शासनाने दिलेल्या लक्षांकाच्या १०६ टक्के कामगिरी असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही (Transport Officer Shyam Lohi) यांनी दिली.

 

जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०२२ यादरम्यान एकूण ८४३ रस्ते अपघात झाले. त्यात एकूण ५६४ व्यक्तींचा मृत्यू झाला, तर ७१९ जण जखमी झाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. यावरून वाहनधारक किती सुसाट व निष्काळजीपणे वाहने चालवितात, हे स्पष्ट होते.

Leave A Reply

Your email address will not be published.