धक्कादायक; मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी पहाटे 4 च्या सुमारास भीषण अपघात

0

मुबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज सकाळीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Highway) शनिवारी पहाटे 4 च्या सुमारास भीषण अपघात झाला. एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ‘सध्या 18 प्रवाशांना एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital) ) दाखल करण्यात आले आहे. तर, 10 प्रवाशांना खोपोली (Khopoli) आणि एका प्रवाशाला खासगी जकोटिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.’ या दुर्घटनेत 29 प्रवाशी जखमी झाले आहेत. यात 24 पुरुषांचा समावेश आहेत. ही अतिशय दुर्देवी घटना आहे. जे प्रवासी मृत्यूमुखी पडलेले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना शासन मदत करेल. तसेच जे लोक जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. याशिवाय ही बस कोसळण्यामागचं नेमकं कारण काय आहे, याची देखील चौकशी करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.