चोरीच्या गुन्ह्यात फरार ‘गोल्डन’ जेरबंद !

0

जळगाव : चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार फरदीन उर्फ साहील गोल्डन जमीलोद्दीन शेख रा. गणेशवाडी, जामनेर याला भुसावळातील जाममोहल्ला परिसरातून एलसीबीच्या पथकाने त्याला अटक केली.

जामनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील फरदीन उर्फ साहील गोल्डन जमीलोद्दीन शेख हा भुसावळातील जाममोहल्ल्यात येणार असल्याची माहिती स्था. गु. शाखेचे वरिष्ठ पो. नि. किसन नजन पाटील यांना मिळाली.

त्यांनी पोहेकों किशोर राठोड, पोना रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, सचिन महाजन यांचे पथक रवाना केले. या पथकाने सापळा रचून दि. २५ रोजी फरदीन याच्या मुसक्या आवळल्या. पुढील कार्यवाहीसाठी त्याला जामनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.