Wednesday, August 10, 2022

सोने चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या आजचा भाव

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत होती. तसेच आता सणासुदीचे दिवस सुरु होणार असल्याने सोने आणि चांदीची मागणी वाढतांना दिसते. याच पाश्वभूमीवर आज सोने आणि चांदीच्या भावात (Gold silver Rate Today) वाढ झालेली आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज २४ कॅरेट सोन्याचे दर ५१,९८० रूपयांवर व्यवहार करत आहेत. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ४७,६५० रुपये इतके आहे. तर १ किलो चांदीचा दर ५८,२०० रूपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या भावात ५०० रुपयांची वाढ झाली आहे.

शहरातील २२ कॅरेट सोन्याचे दर आणि चांदीचे दर :

मुंबई – ४७,७३१ ,५८,२००

पुणे – ४७,७३१, ५८,२००

नाशिक – ४७,७३१, ५८,२००

नागपूर – ४७,७३१, ५८,२००

दिल्ली – ४७,६४८, ५८,१००

कोलकाता – ४७,६६७, ५८,१३०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या