Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»सोने-चांदीच्या भावात घसरण; जाणून घ्या आजचा भाव
    महाराष्ट्र

    सोने-चांदीच्या भावात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

    Tushar BhambareBy Tushar BhambareFebruary 26, 2022Updated:February 26, 2022No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

    रशिया युक्रेन युद्धाचा इतर देशांसहित भारतावर देखील परिणाम होतांना दिसत आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीमध्ये चढ-उतार सुरु आहे. भारतीय सराफा बाजारात, जिथे २४ फेब्रुवारी रोजी सोन्याच्या किमतीने जोरदार उसळी मारली होती. तर शुक्रवारी भारतातील सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळाली.

    तसेच आज देखील २६ फेब्रुवारीला १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ४६,८४० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,८५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

    आजचा भाव

    गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,८४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दरही कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,१०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,८९० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,१९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,९७० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,२४० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६४० रुपये आहे.

    अशी तपास सोन्याची शुद्धता

    सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

    २४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते. २२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते. २१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते. १८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते. १४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

    जळगावातील भाव
    सोने- 51531
    चांदी- 66519

    नाशिकमधील भाव
    सोने- 51761
    चांदी- 66829

    औरंगाबादमधील भाव
    सोने- 51811
    चांदी- 66879

    Gold Rate Gold-Silver Rate Today Silver Rate
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील

    May 18, 2026

    व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif