दीड लाखाची रोकड बँकेत न भरता वेटर फरार; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज

रिलायन्स पेट्रोल पंपजवळ असलेल्या लायबा हॉटेल येथील दीड लाख रूपये बँकेत न भरता परस्पर घेवून हॉटेलचा वेटर फरार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मालकाच्या फिर्यादीवरून फरार झालेल्या वेटरवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वकार इकबाल मंन्सूरी (वय १९, रा. फिरदोस पलेस, सलार नगर, अजिंठा चौक) हे आईवडील व भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. त्यांचे रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ लायबा नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये मोहम्मद आशान अंसारी रा. गाजीपूर (बिहार) हा गेल्या सहा वर्षांपासून हॉटेलचे वेटर म्हणून काम पाहतो. गेल्या सहा वर्षांपासून हॉटेलमध्ये काम करत असल्याचे त्यांच्यावर वकार मंन्सूरी आणि त्यांचे वडील इकबाल मंन्सूरी यांचा विश्वास बसला होता.

दरम्यान, १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता वकार मंन्सूरी यांनी वेटर मोहम्मद अंसारी याला दुसऱ्या पार्टीचे पैसे बँकेत भरण्यासाठी दीड लाख रूपयांची रोकड दिली. मोहम्मद अंसारी हा दीड लाख रूपये घेवून बँकेत न भरता पसार झाला आहे. याबाबत वकार मंन्सूरी यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोठेही आढळून आला नाही. त्याचप्रमाणे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या इतर कामागारांकडून त्याने उधारी म्हणून ९० हजार रूपये घेवून गेल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी वकार इकबाल मंन्सूरी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मोहम्मद आशान अंसारी रा. गाजीपूर (बिहार) यांच्याविरोधात शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी दुपारी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि दिपक जगदाळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.