जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
दिवाळीच्या पाश्वभूमीवर सोने चांदीच्या भावात घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यातच आता दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली आहे. 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 300 ते 400 रुपयांनी वाढला आहे. लगीनसराई लवकरच सुरू होणार असल्याने सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,040 रुपये आहे. चांदीचा भाव 72,400 रुपये आहे. तर जळगाव येथील सराफा व्यापारांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याचे दर 60110 तर चांदीचे दर 72375 रुपये आहेत. कोलकाता – 61,040 रुपये, हैदराबाद – 61,040 रुपये, पुणे – 61,040 रुपये, पटना – 61,090 रुपये आहेत.