धक्कादायक; पत्नीला कॅल्शियमच्या गोळ्यामधून गिळायला लावले ब्लेडचे तुकडे

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

चारीत्र्याच्या संशयावरून पटीने पत्नीसोबत घृणास्पद कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. ४५ वर्षीय पतीने पत्नीला कॅल्शियमच्या गोळ्यांमध्ये ब्लेडचे तुकडे गिळायला लावल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील उत्तमनगरमध्ये घडला आहे. सोमनाथ सपकाळ असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ४१ वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार मागील महिन्यापासून होत होता. गेल्या २ महिन्यांपासून या दाम्पत्यामध्ये सतत वाद सुरू होते. सोमनाथ हा अनेकवेळा त्याच्या पत्नीवर संशय घेत असे. यावरून त्यांच्यात वाद होऊन सोमनाथने त्याच्या पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केल्याचं सुद्धा समोर आलं आहे. दारू पिण्याच्या कारणावरून पत्नी वाद घालत असे म्हणून याच गोष्टीचा राग मनात धरून सोमनाथने पत्नीची हत्या करण्याचा कट रचला होता.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोमनाथने त्याच्या पत्नीला कॅल्शीअमच्या कॅप्सुल दिल्या पण, त्यात आधी ब्लेडचे तुकडे टाकले आणि ते तिला खायला दिले. तसच त्याने तिला जबरदस्ती करत गिळायला लावले. महिलेच्या गळ्यात जखमा झाल्याने त्यांनी वैद्यकीय तपासणी केली असता आणि हा सगळा प्रकार समोर आला. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.