Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जामनेरमध्ये किराणा दुकानाला भिषण आग, सुदैवाने जीवीतहानी टळली
    जळगाव

    जामनेरमध्ये किराणा दुकानाला भिषण आग, सुदैवाने जीवीतहानी टळली

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 16, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जामनेर शहरातील श्रीराम मार्केट भागातील किराणा दुकानाला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान जळुन खाक झाले. परंतु दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी टळली आहे.

    सविस्तर माहिती अशी की, श्रीराम मार्केट भागात प्रल्हाद कुमावत यांचे किराणा मालाचे दुकान असुन अचानक दुकानात आग लागली. दि. १४ रोजी मंगळवारी हि घटना घडली आहे. आग शॉकसर्किट मुळे लागल्याचे बोलले जात आहे. दुकानातील संपूर्ण मालाने आगीचे स्वरूप धारण केल्याने सर्व वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. आपला जीव वाचावा यासाठी यांनी कामगारांनी दुकानाच्या बाहेर पडले. दैव बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले. किराणा दुकानाला आग लागल्याचे माहीत पडताच माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत घटनास्थळी धाव घेतली. लागलेल्या आगीला आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ जामनेर नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाच्या वाहनाला पाचारण करण्यात आले. मात्र तो पर्यंत या भिषण आगीत दुकानातील सुमारे लाखोंचा किराणा माल जळुन भस्मसात झाला. यांच्याकडे उपजीविका चालविण्यासाठी दुसरे कोणतेही साधन नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

    Jamner
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif