लोकशाही न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत काही आमदार गेले आहेत. यात समावेश असलेले मंत्री अनिल पाटील यांच्याबाबत शरद पवार यांनी मोठा दावा केला आहे. पवारांच्या या दाव्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील हे पुन्हा विधानसभेवर निवडून आलेले दिसणार नाही असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केला आहे.
हिवाळी अधिवेशनानंतर अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्र आलेले दिसतील असे विधान मंत्री अनिल पाटील यांनी केले होते. त्यावर सज शरद पवार यांना विचारले असता त्यांनी अनिल पाटील यांच्यावर निशाणा साधत ते पुन्हा विधानसभेवर निवडून आलेले दिसणार नाही. असा दावा केला आहे.
नुकताच अमळनेर बविधानसभा मतदार संघाचा दौरा केला आहे. मतदार संघातील लोकांशी मी बोललो तेव्हा तेथील लोकांमध्ये मंत्री अनिल पाटील यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे त्यांनी सांगितले की अनिल पाटील पुन्हा निवडून येणार नाहीत. शरद पवारांच्या या दाव्यामुळे अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे.