डॉक्टर महिलेवर ३८ वर्षीय आरोपीने केला अत्याचार, आरोपीस अटक

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यातील अनेक अल्पवयीन मुलीसह तरुणीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असतांना पुन्हा एकदा अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. एका ३८ वर्षीय व्यक्तीने महिला डॉक्टरवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिस ठाण्यात बलात्कार आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, एका क्लबमध्ये बॅडमिंटन खेळात असतांना आरोपी आणि महिलेची ओळख झाल्याची पोलिसांचे म्हणणे आहे. घरगुती कारणांमुळे महिला आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. दरम्यान, पीडित महिला आणि तिचा पती यांच्यामधील वाद मिटवून देतो, असे सांगून आरोपीने पीडितेला आपल्या विश्वासात घेतले. यानंतर २० ऑगस्ट रोजी आरोपीने पीडितेला एका क्लबमध्ये बोलावले.

क्लबमध्ये गेल्यानंतर आरोपीने पीडितेला जबरदस्तीने दारू पाजली. तसेच, आरोपीने पीडितेला कारमधून आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान आरोपीने पीडितेला अश्लील व्हिडिओ देखील काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तसेच या व्हिडिओचा आधार घेऊन आरोपीने महिलेकडून पैसे सुद्दा उकळले. दरम्यान दिवसेंदिवस आरोपीचे कृत्य वाढत असल्याने पीडित महिलेने अखेर गावदेवी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.