सोने चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या नवे दर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता होती. मात्र आता सणासुदीचे दिवस सुरु असल्याने सोन्याची मागणी वाढणार आहे. ग्राहक सोन्यात अधिकाधिक गुंतवणूक करतात. त्यामुळे मागणी कायम राहून सोन्याचे भाव कमी होणार नाही.

गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज २४ कॅरेट सोन्याचे दर ५१,३८० रूपयांवर व्यवहार करत आहेत. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ४७,१०० रुपये इतके आहे. तर १ किलो चांदीचा दर ५६,५०० रूपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या भावात १९०० रुपयांची वाढ झाली आहे.

जळगाव येथील सराफ व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोने ५२,३०० रुपये तर चांदी ५९,५०० रुपये आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.