कत्तलीसाठी नेणाऱ्या चार गाईंची सुटका, दोघांवर गुन्हा दाखल

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

वाहतुकीचा परवाना नसताना अवैधरित्या निर्दयीपणे चार गाई कोंबून कत्तलीच्या उद्देशाने मालवाहू पिकअप गाडीतून नेणाऱ्या चार गाईंची  सुटका करण्यात आली. हा प्रकार बजरंग दल कार्यकर्त्यांच्या निर्दशनास आला. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही गाईंना गोशाळेत पाठविण्यात आले आहे.

पो. कॉ. स्वप्नील चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.28 रोजी सायंकाळी भडगाव पारोळा रोडवरील हलवया नाल्याजवळ पांढऱ्या रंगाची मालवाहू पीकअप क्र. एम. एच.19 बी. एम.0178 यामध्ये एक लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या चार गाई प्राण्यांच्या छळ होईल अशा प्रकारे वाहतूक करण्याचा परवाना नसताना देखील अवैधरित्या दाटीवाटीने निदयतेने कोंबून भरून कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असताना मिळून आले.

याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला आरोपी गाडी चालक अनिस खान वजीर पठाण रा. अंतुर्ली ता. पाचोरा, शेख रशीद शेख करीम रा. कबिबगंज रहेमड मज्जिद समोर धुळे यांच्याविरूद्ध भाग 5 गु.र. न.207/ 2022 प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5 (अ) (ब),9 तसेच प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम 1960 चे कलम 11(1) (घ) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 1951 कलम 119 मोटार वाहतूक कलम 130/ 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुढील तपास पो. हे.कॉ. विजय जाधव हे करत आहे. घटनास्थळी बजरंग दल कार्यकर्ते साजन पाटील, मिलिंद बोरसे, दत्तू कोळी, प्रवीण पाटील (सोनू), मयूर मालपुरे, हर्षल पाटील, भूषण देवरे, चेतन पाटील, संदीप पाटील आदी कार्यकर्ते होते.

Leave A Reply

Your email address will not be published.