जळगाव /मुंबई ;- गेल्या दोन दिवसांत सराफ बाजारातील सोन्या-चांदीचे भाव कमी झाले होते. परंतु आज गुरुवारी सोन्याचे भाव पुन्हा वाढले आहेत. आजचे सोन्या-चांदीचे भाव बघितल्यावर कालच्या तुलनेत त्यात एक पटीने वाढ झाली आहे.
Good Return नुसार गुरुवारी, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,550 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,780 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,330 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 61,250 रुपयांनी व्यवहार करत आहे.
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 57,550 रुपये
मुंबई – 57,550 रुपये
नागपूर – 57,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 63,780 रूपये
मुंबई – 63,780 रूपये
नागपूर – 63,780 रूपये
सध्या सोन्याचे भाव वाढले असले तरी चांदीच्या भावामध्ये घसरण झाली आहे. 10 ग्रॅम चांदीचा भाव 772 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,720 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 77,200 अशी आहे. त्यामुळे ग्राहक सोन्यापेक्षा चांदीची मागणी जास्त करताना दिसत आहेत.