जळगावातील जयनगर येथे घरफोडी ; वीस लाखांचा ऐवज लंपास

0

सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव ;- शहरातील जयनगर भागात असणाऱ्या एका घरातून 19 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार 22 जून 2023 रोजी घडला असून याप्रकरणी सहा जणांविरुद्ध रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की , सुरेखा कमलेश मारू( वय 69 )या व्यावसायिक असून त्या शहरातील जय नगर परिसरात वास्तव्याला आहेत. त्यांच्या घरातून 22 जून 2023 रोजी संशयित ललित किसनचंद डेमला, नीता ललित डेमला ,हर्ष ललित ढेमला ,भावना हर्ष डेमला ,सागर सुरेश मोटवानी ,विजय रामदास गुंजाळ सर्व रा. कृष्ण सदन प्लॉट नंबर 38 जयनगर जळगाव यांनी घरातून पाच लाख दहा हजार रुपये रोख ,पाच लाखांचे विवाहात मिळालेले 50 तोळे सोने, दोन लाखांचे भांडे ,दोन लाखांचे पन्ना अंगठी ,साडेचार लाखांचे घरातील सामान, 45 हजार रुपयांचे कंपनीचे घड्याळ ,असा एकूण 19 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची फिर्याद भाडेकरी असलेल्या सुरेखा मारू यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे याबाबत मारू यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.