अवकाळी पावसामुळे नंदुरबार मध्ये पपई, केळी जमीनदोस्त

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आठवडाभरापासून नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीच्या नुकसानीचा आकडा वाढतच दिसत आहे. प्रशासनाकडून पंचनामे सुरु आहे. मात्र दररोज होणाऱ्या पावसामुळे क्षेत्रामध्ये वाढ होत असल्याने पंचनामे पूर्ण होण्यास विलंब होत असल्याचं दिसून येताच आहे. यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

शेतकऱ्यांची सरसकट मदतीची मागणी
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून सलग अवकाळी पावसाने कहर केला असून, मोठया प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालं आहे. शेतीचे नुकसान प्रचंड असून, प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरु झाले असले तरी, दररोज होणाऱ्या पावसामुळे नुकसानीचे क्षेत्र वाढतच जात आहे. परिणामी पंचनामे होण्यास विलंब होत आहे. तर, दुसरीकडे सरकारने पंचनामे यांचा फास न ठेवता सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पावसामुळे नुकसानीच्या क्षेत्रात वाढ
प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र, दररोज होणाऱ्या पावसामुळे नुकसानीच्या क्षेत्र वाढत असल्याचे पंचनाम्यांना वेळ लागत असल्याचं प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान असलं तरी पंचनामे करून काय उपयोग, दुष्काळ जाहीर होऊनही विम्याची अग्रीम मिळत नाही तर, अवकाळीची नुकसानभरपाई कधी मिळेल?, त्यामुळे सरकारने सरसकट मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.