भुसावळातील घरफोडी प्रकरणात तिघांना अटक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जामनेर येथील तीन संशयीतांना भुसावळ शहरातील तुकाराम नगरात झालेल्या घरफोडी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. शेख इरफान उर्फ हर्षद शेख रऊफ (24, टिपू सुलतान चौक, जामनेर), फातेर शेख उर्फ गोल्या तुफेल मोहम्मद शेख (18, ईस्लामपूरा, जामनेर) व शेख समीर उर्फ बाल्या शेख जाकीर (21, मदिना नगर, जामनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

शहरातील तुकाराम नगरात 6 जानेवारी रोजी घरफोडी झाली होती. या घरफोडीत सुमारे 50 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुरनं.19/2023, भादंवि 454, 457, 380 अन्वये बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरफोडीतील संशयीत जामनेरातील असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी अटक केली . तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.