जळगावात मनसेचे गल्लोगल्ली रस्ते आंदोलन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरात गल्लो गल्ली रस्ते आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फ़े आज बुधवार १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू करण्यात आले असून याची सुरुवात शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथील मनसे कार्यालयापासून करण्यात आली. ॲड. जमिल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे.

जळगाव शहरातील जिल्हापेठ भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथील रस्त्यांची अवस्था अतिशय दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता दुरूस्ती करण्यात यावा अशी मागणी जळगावकरांकडून केली जात आहे. नवीन रस्ता तयार होण्यासाठी मनसेच्या वतीने पाठपुरावा केला जात आहे. परंतू याकडे साफ दुर्लक्ष महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे. या अनुषंगाने जळगाव शहरातील गल्लो गल्ली रस्ते आंदोलन या उपक्रला मनसेच्या वतीने सुरूवात करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथील मनसेच्या कार्यालयापासून बुधवारी १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आंदोलना सुरूवात केली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमिल देशपांडे, उपमहानगराध्यक्ष आशिष सपकाळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.