जुना स्मार्टफोनही करेल सीसीटीव्ही कॅमेराचे काम

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोनही सिक्योरिटी कॅमेरा म्हणून यूज करू शकता. विशेष म्हणजे, यासाठी आपल्याला कोणतेही वेगळे अटॅचमेंट खरेदी करण्याची गरज नाही. याच्या सहाय्याने तुम्हाला केवळ लाइव्ह फुटेजच पाहता येणार नाही, तर डिव्हाइसमध्ये सर्व्हिलांन्स फुटेज सेव्हही करता येईल.
फोनमध्ये इंस्टॉल करा सिक्योरिटी कॅमरा अ‍ॅप
सर्वप्रथम आपल्याला आपल्या जुन्या फोनध्ये सिक्योरिटी कॅमेरा अ‍ॅप इंस्टॉल करावे लागेल. अशी अनेक अ‍ॅप्स गूगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर लिस्टेड आहेत. मात्र जे अ‍ॅप आपल्याला क्रॉस-प्लॅटफॉर्म फंक्शनॅलिटीशिवाय लोकल आणि क्लाऊड स्ट्रिमिंग आणि क्लाऊडवर फुटेज स्टोर करण्यासारखे अथवा मोशन डिटेक्ट अलर्ट्स पाठविण्यासारखे फीचर्स देईल, असे अ‍ॅप निवडायला हवे. असे एक अ‍ॅप आहे, Alfred DIY CCTV Home Camera आणि हे सेट करणेही सोपे आहे.

1. तुमच्या जुन्या आणि नव्या (ज्या फोनवरून तुम्हाला सुरक्षा फुटेज पहायचे आहे), फोनवर Alfred DIY CCTV Home Camera अ‍ॅप डाउनलोड करा
2. आपल्या नव्या प्रायमरी फोनमध्ये अ‍ॅप ओपेने केल्यानंत, स्क्रीनवर दिसणाऱ्या सूचनांचे पालन करत, ‘Start’ वर टॅप करा. आता ‘Viewer’ निवडल्यानंतर, ‘Next’ वर टॅप करावे लागेल.
3. यानंतर आपल्याला आपल्या Google Account च्या मदतीने Sign In करावे लागेल.
4. जुन्या फोनवरही हीच प्रक्रिया करत आपल्याला ‘Viewer’ च्या एवजी ‘Camera’ निवडायचा आहे आणि त्याच Google अकाउंटला लॉगिन करायचे आहे.

सेटिंग्जमध्ये जाऊन, तुम्ही इतर आवश्यक बदल करू शकाल आणि जुन्या फोनच्या कॅमेऱ्याने रेकॉर्ड केलेले फीड आपण प्रायमरी फोनमध्ये दिसेल.

आपला जुन्हा फोन निश्चित ठिकाणी सेट करा…-
आपण आपला जुना फोन CCTV कॅमेऱ्याप्रमाणे कुठेही सेट करू शकता आणि याचे फुटेज प्रायमरी फोनमध्येही बघू शकता. महत्वाचे म्हणजे, यासाठी दोन्ही फोन वायफाय अथवा इंटरनेटला कनेक्ट असायला हवेत. याच बरोबर आपल्याला एखाद्या पॉवर केबलने जुन्या फोनला पॉवर द्यावी लागेल. यामुळे तो डिस्चार्ज होणार नाही. आपण पॉवरबँक अथवा सरळ चार्जरचाही वापर करू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.