‘सिंघम अगेन’ साठी अजय रोहित येणार पुन्हा एकत्र !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
‘सिंघम’, ‘सिम्बा’ आणि ‘सूर्यवंशी’ सारखे सुपरहिट कॉप ड्रामा चित्रपट दिल्यानंतर रोहित शेट्टी आता पुढचा कॉप युनिव्हर्स चित्रपट ‘सिंघम अगेन’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अजय देवगणच्या बहुप्रतीक्षित ‘सिंघम’चा हा तिसरा भाग असणार आहे. यामध्ये अजय देवगण पुन्हा एकदा कडक पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री दीपिका पदुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे ‘सिंघम अगेन’ची कथा ‘सिम्बा’ आणि ‘सूर्यवंशी’ या चित्रपटांशी जोडलेली असेल अशी माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे अभिनेता अक्षय कुमार आणि रणवीर सिंग हे तिन्ही सुपरस्टार्स एकाच चित्रपटात आपापल्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. मात्र, ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख अद्याप सांगण्यात आलेली नाही.

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.