जी. एच. रायसोनी महाविध्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात

0

लोकशाही न्युज नेटवर्क
जी. एच. रायसोनी इस्टीट्यूट संचलित रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व अभियांत्रिकी महाविद्यालय व रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या भव्य प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी दीपक सैनी,माधवी घुगे, पल्लवी सुर्वे,शुभम रॉय, कार्तिक पाटील, शाहनवाज सय्यद या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम क्रमाकांनी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना रायसोनी इस्टीट्यूटचे ऍडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी यांनी संयुक्तिकरित्या मार्गदर्शन केले.

ते यावेळी म्हणाले की, विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील नागरिकांना संविधानाने समान हक्क दिले आहेत. आपल्या लाभलेले हक्क व कर्तव्यांचा वापर देशहितासाठी करून शांतता, समता व बंधुता ही मूल्ये जोपासावी व आपल्या हक्कांचा वापर करत असतांना देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवावी असा मौलिक संदेश मार्गदर्शकानी दिला. यावेळी रायसोनी इस्टीट्यूटच्या म्युझिक क्लबच्या विध्यार्थ्यानी राष्ट्रध्वजास मानवंदना देत विविध देशभक्तीपर गीते सादर केली
.
तसेच डान्स क्लबच्या विध्यार्थ्यानीही देशभक्तीपर नृत्य सादर केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वरी नेमाडे व प्रज्वल वाकलकर या टोस्ट मास्टर क्लबच्या विध्यार्थ्यानी केले. तर यावेळी रायसोनी इस्टीट्यूटच्या विविध महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.